होम  »  व्हिडिओ»नवीन पेन्शन योजना 2009
नवीन पेन्शन योजना 2009
Rate this video
2 Average Rating
URL:
Embed:
30 मेच्या श्रीमंत व्हामध्ये न्यू पेन्शन प्लॅनबद्दल माहिती घेतली. आर्थिक सल्लागार चित्रा पोतदार यांनी प्रेक्षकांना या नव्या सरकारी पेन्शन योजनेची माहिती दिली.

नवी पेन्शन योजना सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे. जी 2004नंतर सरकारी नोकरीत सामील झालेल्या कर्मचार्‍यांसाठी लागू आहे. तसंच आता 1 मे 2009 नंतर ही योजना देशातल्या सर्व नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. हे या योजनेचं वैशिष्ट्य म्हणता येईल. या योजनेत कमीतकमी 500 रुपयांची दरमहा गुंतवणूक करता येते आणि दरवर्षी अशाप्रकारे सहा हजार रुपये गुंतवणूक दाराला गुंतवता येतात. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर करसवलत देखील मिळणार आहे. साठ वर्षांनतर मॅच्युअर झालेली रक्कम मात्र करपात्र असणार आहे. 18 ते55 वर्षांपर्यंतची कोणीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. या नव्या पेन्शन योजनेचं नियोजन सहा खाजगी फंड मॅनेजर्सकडे देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या योजनेवर PFRDAचं नियंत्रण असणार आहे. देशभरात 324 संपर्क केंद्रावर या योजनेचे फॉर्म्स मिळू शकतील. नव्या पेन्शन योजनेत गुंतवणुकीसाठी पर्मनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर आवश्यक आहे. तसंच नव्या पेन्शन योजनेतून दरवर्षी फक्त 10% विड्रॉवलची सोय आहे. अशाप्रकारची महत्त्वपूर्ण माहिती चित्रा पोतदार यांनी दिली. त्याचप्रमाणे चित्रा पोतदार यांनी बोलताना या नव्या सरकारी पेन्शन योजनेमधला आणि इतर खाजगी पेन्शन योजनांमधला फरकही स्पष्ट केला.

प्रतिक्रिया

Posted by bs halwai

The age considered under scheme is 18-55 yrs

Your Comments:

Name
Email:
Country: