होम  »  व्हिडिओ»गांधीजींच्या रक्ताच्या स्लाईडचा आज होणार लिलाव
गांधीजींच्या रक्ताच्या स्लाईडचा आज होणार लिलाव
Rate this video
0 Average Rating
URL:
Embed:
21 मे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्ताच्या स्लाईडचा आज इंग्लंडमध्ये लिलाव होणार आहे. इंग्लंडमधल्या श्रॉफ शायरमध्ये हा लिलाव होईल. मुलॉक्स
ऑक्शनरीज ही लिलाव करणारी कंपनी गांधीजींच्या 50 वस्तूंचा लिलाव करणार आहे. या लिलावात महात्मा गांधींच्या ब्लड टेस्टसाठी घेण्यात आलेल्या ब्लडस्लाईड्स जवळपास एक ते दीड लाख पौंड इतक्या प्रचंड बोलीने विकल्या जाण्याची शक्यता आहे. 1924 मध्ये गांधीजींवर मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये अपेन्डिक्सचे उपचार सुरु होते तेव्हा त्यांची ब्लडटेस्ट झाली होती. यावेळी गांधीजी मुंबईत जुहू परिसरात ज्या मित्राकडे उतरले होते त्यांच्याकडे या ब्लडस्लाईड्स होत्या. याच परिवाराच्या संग्रहातील वस्तूंचा लंडनमध्ये होणार्‍या लिलावात समावेश आहे.
 
Your Comments:

Name
Email:
Country: