होम  »  व्हिडिओ»पाऊलखुणा
पाऊलखुणा
Rate this video
4 Average Rating
URL:
Embed:
शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा हा विचार देणारे दलितांचे कैवारी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 121 वी जयंती देशभरासह राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मठिकाण मध्यप्रदेशच्या महू इथे आहे. दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी देशभरातून आदरांजली वहायला लोक जातात. बाबासाहेबांचं जन्मस्थान असलेल्या महूचा विकास मध्यप्रदेश सरकारने केला. केंद्र सरकारने देशातील 25 शहरांची नावं बदलायला परवानगी दिली. त्यात महूचाही समावेश आहे. लवकरच महूचं नाव आंबेडकर नगर होणार आहे. ब्रिटिशांनी आर्मीमध्ये महारांची बटालियन मध्यप्रदेशच्या महू इथे स्थापन केली, तिथेच बाबासाहेबांचे वडील सुभेदार मेजर रामजी मालोजी सपकाळ शिक्षक म्हणून होते. महूला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891 मध्ये झाला. महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं मूळगाव रत्नागिरीमधील मंडणगड तालुक्यातलं आंबवडे. याच गावाच्या नावावरुन बाबासाहेबांना आडनाव मिळालं. बाबासाहेबांचे नातेवाईक आजही या गावात राहतात. या गावाला... तिथल्या माणसांना बाबासाहेबांचा खूप अभिमान आहे. यावरच हा विशेष कार्यक्रम पाऊलखुणा बाबासाहेबांच्या.. 
Your Comments:

Name
Email:
Country: