होम  »  व्हिडिओ»बाळासाहेबांची शेवटची मुलाखत ( भाग 1 )
बाळासाहेबांची शेवटची मुलाखत ( भाग 1 )
Rate this video
4 Average Rating
URL:
Embed:
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी इच्छा खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज सोडून गेला हे घडायला नको हवं होतं. दोघांच्या या भुमिकेमुळे शिवसेनेचं नुकसान होतं नाही तर महाराष्ट्राच होतं आहे असा गौप्यस्फोट बाळासाहेब ठाकरे यांनी आयबीएन लोकमतच्या मुलाखतीत केला.
 
 
18 डिसेंबर 2005 ला राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडला आणि स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष उभा केला. पण राज यांच्या जाण्याचे बाळासाहेबांना कायम दुख होतं. राज जाताना बोलून सुध्दा गेला नाही. असं खुद्द बाळासाहेबांनी म्हटलं आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने झालेले जाहीर सभेत राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसाठी शंभर पावलं पुढे येईन, त्यांनी भेटायला बोलावले तर मी जाईन असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. पण उध्दव ठाकरे दगाबाज आहे त्यांच्यासाठी एक पाऊल सुध्दा पुढे टाकणार असंही ठणकावून सांगितले. पण दोघाभावांच्या वेगळे राहिल्यामुळे बाळासाहेबांना आजही दुख आहे. राज आणि उध्दव यांनी एकत्र यावे, या दोघांच्या वेगळेपणामुळे हे शिवसेनेचे नुकसान नाही तर महाराष्ट्राचे नुकसान होतं आहे. पण हा मराठ्यांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांना जिजामाताचे सख्ये बंधू यांना मुसक्या बांधून तुरुंगाच टाकावे लागले होते. मग हा कोण आहे ? हा स्वत:ला जिजामातेचा भाऊ समजतो का ? राज यांने बाहेर पडणं हे घडायला नको होते. आता त्यांनी एकत्र यावे पण त्यांचे निर्णय त्यांनीच घ्यावे त्यांना स्वातंत्र्य आहे असंही बाळासाहेब म्हणाले.

 

बाळासाहेब ठाकरे यांची शेवटची मुलाखत भाग 2 पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा 

 

 

प्रतिक्रिया

Posted by GAURAV

Balasahebancha prabhave sampevanara ajune janamala alela nahi.

Posted by avadhut dhamankar

वाघांचा राजा

Posted by sushant jadhav

राज परत यायला पाहिजे शिवसेने मधे

Posted by prashant sudake

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यकरिता राज आणि उद्धव साहेबानी एकत्र यायलाच पाहिजे, हीच काळाची गरज आहे. बाळासाहेबाना हीच भवपूर्ण श्रद्धांजली ठरेल. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र............

1
. 2 .
Your Comments:

Name
Email:
Country: