होम  »  राज्य   »  साखर कारखान्यावरून राणे-सावंत यांच्यात जुंपली

सिंधुदुर्ग 12 जून :येथील दोन काँग्रेस नेत्यांमध्ये सध्या नियोजित साखर कारखान्यावरून वाद सुरू आहे. उद्योग मंत्री नारायण राणे आणि विधान परिषदेचे आमदार विजय सावंत या दोघांनाही सिंधुदुर्गात साखर कारखाना काढायचाय. राणेंच्या कंपनीनं साखर आयुक्तांकडे दाखल केलेल्या प्रस्तावात कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनीचं खरेदी खत बोगस असल्याचा आरोप सावंत यांनी केलाय.

 

त्यामुळे ही जमीन खरेदीच संशयास्पद असल्याचं सावंत यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राणे व्हेंचर्स या कंपनीच्या सर्व संचालकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा आणि सीआयडी चौकशी करा अशी मागणी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. तर दुसरीकडे विजय सावंत यांनी आपल्या कारखान्याला मिळवलेली परवानगी ही सरकारची फसवणूक करुन आणि हेराफेरी करुन मिळवल्याचं राणेंचं म्हणणं असून यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे .

 

विजय सावंत यांनी राणेंच्याविरोधात दिलेल्या या पुराव्यांमुळे राणेंचे कार्यकर्ते बिथरले असून कोणत्याही परिस्थितीत सावंत यांचा कारखाना होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान सावंत यांच्या कारखान्याला परवानगी मिळालेली असून राणेंना अद्याप परवानगी मिळालेली नाही.
 

Rate this article:
Average User rating on this article: 3 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]