होम  »  देश-विदेश   »  अन्नसुरक्षा विधेयकावर अध्यादेशाची सरकारची तयारी
नवी दिल्ली 12 जून : मोठ्या विरोधानंतरही अन्नसुरक्षा विधेयकावर अध्यादेश आणण्याची तयारी सरकारनं केलीय. अध्यादेश आणण्यावर सरकारमध्येच मतभेद आहेत. कृषिमंत्री शरद पवार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के व्ही थॉमस यांचा अध्यादेशाला तीव्र विरोध आहे. काँग्रेस याच वर्षाच्या अखेरपर्यंत मुदतपूर्व निवडणुकांची तयारी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसला अन्नसुरक्षा विधेयक लवकरात लवकर आणायचा आहे. पण त्यात विरोधकांनी दुरुस्त्या सुचवणं काँग्रेसला मान्य नाहीय. अशा दुरुस्त्यांमुळे पावसाळी अधिवेशनातही विधेयक मार्गी लागणार नाही, अशी भीती काँग्रेसला वाटतेय.
 
Rate this article:
Average User rating on this article: 0 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]