होम  »  राज्य   »  दुष्काळी भागात पाणी योजना 3 वर्षांत पूर्ण होणार -पवार

12 जून सांगली : राज्यातल्या दुष्काळी भागातल्या पाणी योजना येत्या तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण केल्या जातील असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलाय. ते काल सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते.

 

त्यांनी जत तालुक्यातल्या शेगाव, बनाळी या गावांमध्ये चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकर्‍यांची विचारपूस केली. दुष्काळ निवारणासाठी राज्य आणि केंद्र सरकार तीन वर्षांमध्ये प्रत्येकी 30 हजार कोटी देणार आहे. या 60 हजार कोटी रुपयांमधून राज्यातल्या पाणी योजना पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

पाच देशातील हवामान खात्याच्या अहवालानूसार यंदाच्या वर्षी भारतात 98 टक्के पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.त्यामुळे हा अंदाज खरा ठरावा अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
 

Rate this article:
Average User rating on this article: 0 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]