होम  »  देश-विदेश   »  जेडीयू-भाजपमध्ये फारकत ?

नवी दिल्ली 12 जून : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भाजपनं प्रचार प्रमुखपदी निवड केल्यानंतर भाजप आणि जेडीयूदरम्यानचे संबंध आणखी ताणले गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू-भाजप आघाडी लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी संध्याकाळी संयुक्त जनता दलाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये अपक्ष आमदारांना स्वतःच्या बाजूनं वळवण्याविषयी नेत्यांना सांगण्यात आलंय.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीशकुमार एक नवीन फेडरल फ्रंट उभारण्याच्या तयारीत लागले आहे. यामध्ये ओडिसा,बिहार आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सहभागी असतील. नितीशकुमार यांच्या मते या तिन्हीही राज्यांना विशेष दर्जा मिळला पाहिजे. याच मुद्यावर तिन्ही राज्याचे मुख्यमंत्री एकत्र येत आहे. नितीशकुमार या अगोदर बीजेडीच्या रॅलीला पाठिंबा दिला होता. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आज विशेष दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत रॅली आयोजित केली आहे. नितीशकुमार यांनी जेडीयूचे संसदीय सदस्य के.सी.त्यागी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी भेट घेण्यासाठी पाठवले आहे.


जेडीयूच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार जर ओडिसा,बिहार आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री एकत्र आले तर येणार्‍या निवडणुकीत भाजप अथवा काँग्रेसचे सरकार आले तर सत्ता स्थापनेसाठी फेडरल फ्रंड महत्त्वाची भूमिका बजावतील. आणि आपली मागणी पूर्ण करून घेतील.


जेडीयू आणि भाजपची युती तुटली तर?


- जेडीयूकडे 119 जागा आहेत पण त्यापैकी एक बंडखोर आहे
- जेडीयूनं भाजपशी युती तोडल्यास त्यांना बहुमतासाठी 4 जागा कमी पडतील
- जेडीयूला चारपैकी तीन अपक्षांकडून पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे
- विधानसभेत मतदानाची वेळ आल्यास काँग्रेसकडून पाठिंबा मिळण्याची जेडीयूला अपेक्षा आहे


नेमका काय परिणाम होईल?

 

- भाजपला बिहारमधील सत्ता सोडावी लागेल. जेडीयूची बिहारमध्ये एकहाती सत्ता असेल.
- भाजप बिहारमधल्या सत्तेतून बाहेर पडल्यास त्यांच्या राज्यातल्या लोकसभेच्या बारा जागांवर परिणाम होईल
- भाजपसोबत असलेल्या युतीमुळे जेडीयुला बिहारमधल्या उच्चवणीर्ंयांची मतं मिळतात. ती मतं कमी होण्याचा जेडीयुला फटका बसू शकेल
- या सगळ्यामुळे लालू यादव यांच्या राजदला फायदा होऊ शकतो
 

Rate this article:
Average User rating on this article: 3 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]