होम  »  राज्य   »  राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द
मुंबई 12 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातलं अटक वॉरण्ट कोर्टाने रद्द केलं आहे. राज ठाकरे आज वांद्रे कोर्टात सुनावणीसाठी हजर झाले होते. ऑक्टोबर 2008 मध्ये वांद्रे इथल्या चेतना महाविद्यालयात रेल्वे भरती परीक्षा मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळली होती. तसंच परप्रांतीयांनी मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी राज ठाकरेंना रत्नागिरी इथून अटक करून वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी जामीन मिळाल्यानंतर राज ठाकरे सुनावणीसाठी कोर्टात हजर न राहिल्यामुळे वांद्रे कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अटक वाँरंट जारी केलं होतं.

 
Rate this article:
Average User rating on this article: 1 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]