होम  »  राज्य   »  जि.प.च्या शाळेतच आढळले बालकामगार

हिंगोली 12 जून : आज बालकामगार दिन....बाल कामगार कामाला लावणं हा कायद्यानं गुन्हा असला तरी सरकारकडूनच या कायद्याच उल्लंघन होताना दिसतंय. हिंगोली औढा नागनाथ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनेक बालकामगार आढळले.

 

जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या बांधकामासाठी बाल कामगारांचा सर्रास वापर होतोय. या बांधकामाच्या कंत्राटदाराने या बालकामगारांना कामाला लावलंय. या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषदेने मात्र दुर्लक्ष केलंय.

150 रुपये मजुरीवर काम करणार्‍या या बाल कामगारांची पिळवणूक होतेय. संबंधित कंत्राटदारावर आणि दोषी अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी संघटनेन आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
 

Rate this article:
Average User rating on this article: 5 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]