होम  »  स्पोर्टस   »  धोणीच्या 'बिझनेस'ची होणार चौकशी ?

12 जून नवी दिल्ली : भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीचं मिशन चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असतानाच इकडे मायदेशी मात्र धोणीविरुद्ध मोहिमेला वेग आलाय. धोणीच्या वैयक्तीक व्यावसायिक हितसंबंधाबाबत चौकशी करण्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेत.

 

भारतीय टीममधल्या 3 खेळाडूंचं जाहिरात व्यवस्थापन धोणीची कंपनी करते असा आरोप धोणीवर होता. मीडियातून आलेल्या या रिपोर्टची दखल बीसीसीआयने घेतलीय. बीसीसीआयच्या बैठकीत यावर चर्चा झाली. या आरोपांची चौकशी करण्यात येईल असं बीसीसीआयतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पण ही चौकशी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतरच करण्यात येणार असल्याचं बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमियांनी स्पष्ट केलं.


धोणीने केला बिझनेससाठी क्रिकेटचा वापर? 

 

रिती स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये धोणीचे 15 टक्के शेअर्स आहेत. या कंपनीकडून धोणी आणि चार खेळाडूंचे व्यवहार सांभाळले जातात. सुरेश रैना, रवींद्र जडेजा, प्रग्यान ओझा आणि आर. पी. सिंग यांचे व्यवहार रितीकडे आहेत.

 

हे सर्व खेळाडू धोणीच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. खेळाडूंची निवड करताना, कॅप्टनच्या मतालाही महत्त्व असतं. आर पी सिंग वगळता उरलेले तीन खेळाडू भारतीय टीममध्ये आहेत. त्याचवेळी धोणी चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन आहे. या टीमचे मार्केटिंगही रिती मॅनेजमेंटकडूनच केले जाते. स्पॉट फिक्सिंग आणि गुरुनाथ मयप्पन प्रकरणी महेंद्र सिंग धोणीनं मौन बाळगलंय.

 

Rate this article:
Average User rating on this article: 4 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]