होम  »  मुंबई   »  मनसेचे आमदार राम कदम यांना अटक

मुंबई 11 जून : रेशनिंग अधिकार्‍याला मारहाण प्रकरणी मनसेचे आमदार राम कदम यांना अटक करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी राम कदम यांनी अधिकार्‍याला मारहाण केली होती. या प्रकरणी आज पंतनगर पोलिसांनी ही कारवाई केली. राम कदम यांना विक्रोळी कोर्टात हजर केले जाणार आहे.  रेशनिंग अधिकारी महेश पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप राम कदम यांच्यावर आहे. मात्र त्यांच्या समर्थकांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. राम कदम यांच्या आरोप आणि अटक होण्याची ही पहिली वेळ नाही. अलीकडेच विधानसभेत पीएसआयला मारहाण प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी कदम यांनी तीन दिवस तुरंगाची हवा खावी लागली होती.


 हे ही वाचा - असे आहेत आमदार राम कदम ! 

Rate this article:
Average User rating on this article: 4 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]