होम  »  देश-विदेश   »  कोळसा घोटाळा: जिंदाल यांच्याविरोधात नव्याने FIR दाखल
नवी दिल्ली 11 जून : कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी काँग्रेससमोरच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव आणि खासदार नवीन जिंदाल यांच्याविरोधात सीबीआयने नवीन एफआयआर दाखल केली आहेत. तसंच सीबीआयने दिल्लीमधल्या जिंदाल यांचं घर आणि त्यांच्या कंपनी ऑफिसवर छापे टाकले आहेत. नवीन जिंदाल आणि जिंदाल पॉवर अँड स्टील ही त्यांची कंपनी यांनी एकूण मिळकत खोटी दाखवून कोळसा खाणींचे ब्लॉक्स मिळवल्याचा आरोप एफआयआरमध्ये ठेवण्यात आलाय. त्यांच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्र बनवल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. नवीन जिंदाल यांच्या कंपनीला खाणींचे सर्वाधिक 11 ब्लॉक्स मिळाले होते. दरम्यान, चौकशीसाठी सीबीआयला सहकार्य करत असल्याचं जिंदाल यांच्याकडून सांगण्यात आलंय.
 
Rate this article:
Average User rating on this article: 5 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]