होम  »  मुंबई   »  माहीम इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या सातवर

मुंबई 11 जून : येथील माहीममध्ये दर्ग्याजवळ अल्ताफ मॅन्शन या 5 मजली इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातातल्या बळींची संख्या सातवर गेली आहे. या दुर्घटनेत सहा जण जखमी झालेत. रात्री माहिमच्या छोटा दर्गा भागात ही घटना घडली. इमारतीच्या तळमजल्यावर दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

ढिगार्‍याखाली अजून काही जण अडकले असल्याची शक्यता आहे असं मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागानं सांगितलंय. जखमींमध्ये अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍याचाही समावेश आहे. रात्रभर बचावकार्य सुरू होतं. मात्र, पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. दुर्घटनेनंतर मुंबईचे महापौर सुनिल प्रभू यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या बचावकार्य करत आगे. तसंच महापालिकेची तीन पथकंही त्याठिकाणी आहेत. ढिगार्‍याखालून 3 जणांना बाहेर काढण्यात आलंय. त्यांना भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
 

Rate this article:
Average User rating on this article: 5 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]