होम  »  मनोरंजन   »  सूरज पांचोलीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी


मुंबई 11 जून :
बॉलीवूडची अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर सूरज पांचोलीला अटक केलीय. आज त्याला न्यायलयात हजर केले असता त्याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर आदित्य पांचोली मात्र सोमवार रात्री पासून फरार आहे.

 

3 जून रोजी जियाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी तिने लिहिलेलं पत्र तिच्या कुटुंबीयांनी शनिवारी प्रसिद्ध केलंय. त्यात सूरज पांचोलीनं आपल्याला फसवल्यामुळेच आपण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं जियानं म्हटलं आहे. पोलिसांनी या पत्राच्या आधारे सोमवारी सूरज पांचोलीला चौकशीसाठी बोलावून घेतलं आणि चौकशीनंतर अटक केली. कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेलं पत्राची हस्ताक्षराची खात्री पटवून घेण्याच काम मुंबई पोलीस करत आहे.
 

Rate this article:
Average User rating on this article: 4 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]