होम  »  देश   »  भाजपमध्ये मोदी पर्व सुरू

09 जून 2013

पणजी - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची अखेर आज भाजपच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजप कार्यसमितीच्या बैठकीत अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी ही घोषणा केली. गेली दोन दिवस याबाबत उत्सुकता होती. मात्र ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी नाराज असल्यानं संभ्रम कायम होता. मात्र मोदी समर्थकांची वाढती संख्या आणि कार्यकर्त्यांचा दबाव यामुळं निर्णय घेण्याशिवाय भाजपकडे पर्यायही नव्हता. संघानेही आपलं मत मोदींच्या पारडयात टाकल्यानं अडवानींचं फारसं काहीच चाललं नाही. काल रात्री उशीरापर्यंत भाजपमध्ये खलबतं सुरू होती. सर्वांशी चर्चा केल्यानंतर मोदींचं नाव जाहीर करण्याबद्दल सहमती झाली आणि मोदींचा मार्ग सोपा झाला.


यशवंत सिंन्हा - माझा मोदींना विरोध नाही, आता वाद शांत होईल
अकाली दल - भाजपच्या निर्णयाचं स्वागत
शिवसेना -
हा भाजपचा निर्णय, पंतप्रधानपदाचा निर्णय एनडीएच्या बैठकीत व्हावा
जनता दल (धर्मनिरपेक्ष) - हा भाजपचा अंतर्गत प्रश्न

 

Rate this article:
Average User rating on this article: 4 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]