होम  »  बिझनेस  »  डिझेल दरमहिन्याला 40 ते 50 पैशांनी महागणार

01 फेब्रुवारी

महागाईला वैतागलेल्या सर्वसामान्य जनतेमागचा दरवाढीचा शुक्लकाष्ठ काही हटायचा नाव घेईना. आता दरमहिन्याला डिझेलच्या किंमती 40 ते 50 पैशांनी वाढवल्या जाणार असल्याचं पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी अधिकृतपणे स्पष्ट केलं आहे. सरकारनं डिझेलच्या किमतीवरील नियंत्रण काढल्यानंतर आता तेलकंपन्यांनी डिझेलच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. डिझेलवरील सबसिडी हळूहळू संपवली जाणार आहे. सध्या डिझेलला एका लीटरसाठी दहा रुपये सबसिडी दिली जाते. एकदाच दरवाढ करू नये यासाठी दरमहा 40 ते 50 पैशांची वाढ केली जाणार आहे. या वर्षाच्या सुरूवातीलाच या दरवाढीबद्दल पेट्रोलियम मंत्रालयाने आपले धोरण जाहीर केलं होतं. ही दरवाढ दरमहा असून त्याची मर्यादा वर्षभरासाठी असणार आहे. डिझेल दरवाढीमुळे महागाईच्या आगीत आणखी तेल ओतणारी ठरणार आहे अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.


डिझेल नियंत्रणमुक्त कशासाठी ?

 

- भारताचा मोठा खर्च पेट्रोलियम आयातीवर होतो
- सबसिडीमुळे सध्या तेल कंपन्यांना दररोज 384 कोटींचा तोटा
- सध्या प्रतिलिटर 9 रु. तोटा तेल कंपन्यांना सहन करावा लागतो
- 2012-2013 मध्ये पेट्रोलियम सबसिडीमुळे 1 लाख 60 हजार कोटींचा सरकारी तिजोरीवर भार
- अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अर्थ मंत्रालयानं केळकर समिती नेमली
- आर्थिक तूट भरून काढण्यासाठी पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ करण्याची शिफारस
- 2014-15 या आर्थिक वर्षात पेट्रोलियम पदार्थ नियंत्रणमुक्त करण्याची समितीची शिफारस
- दरवाढ आणि नियंत्रणमुक्तीमुळे अर्थव्यवस्थेवरचा भार कमी होणार

डिझेल नियंत्रणमुक्त होण्याचे परिणाम

- आर्थिक सुधारणेच्या दृष्टीनं पुढचं पाऊल
- आर्थिक तूट कमी व्हायला मदत
- तेल कंपन्यांचा तोटा कमी होणार
- महागाईत मात्र वाढच होण्याची शक्यता
- आरबीआय व्याजदरात कपातकरण्याची शक्यता
- खासगी क्षेत्राला सकारात्मक संदेश

डिझेल दरवाढीचा फटका

- वाहतूक खर्च वाढणार
- व्यावसायिक वाहनांच्या खर्चात वाढ
- पाण्याचा पंप, ट्रॅक्टरसाठी डिझेलचा वापर, त्यामुळे शेतकर्‍यांच्या खर्चात वाढ
- खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ
- या सर्वांचा परिणाम महागाई वाढण्यात होणार

 

Rate this article:
Average User rating on this article: 3 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]