होम  »  स्पोर्टस   »  सचिन नावाच्या 'क्रिकेट'ला 23 वर्ष !

15 नोव्हेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीला आज तब्बल 23 वर्ष पूर्ण झाली आहे. अहमदाबाद टेस्टमध्ये आज तो केवळ 13 रन्सवर आऊट झाला. पण आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत सचिननं बॅटिंगमधले जवळपास सर्व रेकॉर्ड नावावर केले आहे. 23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतले हे काही ठळक क्षण....


तेंव्हाचा नुकतं मिसुरडं फुटलेला सचिन आणि आताचा विक्रमांचा बादशहा असलेला सचिन... सचिनचा जन्मच बॅटिंगसाठी झालाय आणि गेली 23 वर्ष अव्याहतपणे तो तेच करत आला आहे.


पदार्पणाच्या सीरिजमध्ये पाकिस्तानच्या फास्ट बॉलर्सचा मुकाबला ज्या समर्थपणे त्यानं केला, त्याच जोशात त्यानं वन डेतही पहिलीवहिली डबलसेंच्युरीही ठोकली. पहिली सेंच्युरी जेव्हा त्यानं केली तेव्हा भारतीय टीमला त्यानं पराभवापासून वाचवलं होतं. त्याच्या प्रत्येक सेंच्युरीची करोडो क्रीडाप्रेमी वाट बघतात.

जगातल्या प्रत्येक बॉलरला त्यानं प्रभावीपणे उत्तर दिलंय. बॅटिंगमधला एकही रेकॉर्ड नाही जो सचिनच्या नावावर नाही आणि काही रेकॉर्डच्या बाबतीत तर त्याचं स्थान अढळ आहे.

सचिननं खेळायला सुरुवात केली तो काळच बॅट्समनच्या दादागिरीचा होता. त्यामुळे सचिनला प्रतिस्पर्धीही अनेक होते, वेस्टइंडिजचा ब्रायन लारा, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉण्टिंग यांच्याशी त्याची तुलना कायम झाली.


नंतर तर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये त्याची स्पर्धा सेहवाग, द्रविड, लक्ष्मण यांच्याशी समीक्षकांनी लावली. पण अंतिम सत्य हे आहे की सचिनची रन्सची भूक इतर बॅट्समनपेक्षा जास्त आहे. वन डे क्रिकेटमध्ये तर त्याच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल असा बॅट्समन शोधून सापडणार नाही. वर्ल्ड कप सारख्या सर्वोच्च स्पर्धेत सर्वात जास्त रन्स सचिनच्या नावावर आहेत. घरच्या मैदानावर वर्ल्ड कप उचलण्याचा मानही त्याला लाभला.


टेस्ट क्रिकेटमध्ये गेली दोन दशकं त्यानं भारतीय बॅटिंगची धूरा वाहिली आहे. काहीवेळा धडाकेबाज बॅटिंग करत तर काहीवेळा कलात्मक शॉट्स खेळत त्यानं क्रीडाप्रेमींची मनं जिंकली.


सचिन भारतीय टीममध्ये जेव्हा आले तेव्हा सध्याचे त्याचे काही साथीदार नुकतं उभं राहिला शिकत होते. पण तरिही सचिन त्यांच्यासाठी सीनिअर खेळाडू नाही तर त्यांचा मित्र आहे. आणि गरज पडली तर मार्गदर्शकही.. आता क्रिकेटमध्ये नवा टप्पा त्यानं गाठलाय, पण त्याचा प्रवास पुढे सुरुच राहणार आहे.
 

Rate this article:
Average User rating on this article: 3 out of 5
प्रतिक्रिया

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]