होम  »  देश-विदेश   »  'लोकपाल'साठी अण्णांची नव्याने लढाई

10 नोव्हेंबर


जनलोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नव्या टीमसह पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. आज अण्णांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली. या टीममध्ये 15 मुख्यसदस्य आणि 100 आर्मीचे अधिकारी, 9 आयएएस अधिकारी त्यात 7 डीजीपी आणि हजारो प्रशिक्षकांचा सहभाग असणार आहे. तसेच लोकपालसाठी 29 नोव्हेंबरपासून देशव्यापी दौरा करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं.


लोकपाल विधेयक आणि भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांनी दीडवर्षापूर्वी देशव्यापी आंदोलन उभारले होते. अण्णांच्या या आंदोलनाला सार्‍या देशाने आपला पाठिंबा देत रस्त्यावर उतरले होते. मात्र अलीकडेच इंडिया अगेन्सट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली आणि टीम अण्णा बरखास्त झाली. अण्णांनीही मी राजकारणात जाणार नाही आणि आंदोलन सुरुच राहिलं असं स्पष्ट केलं. आज अण्णांनी आंदोलनाला नवी दिशा देण्यासाठी रणनीती आखली. यासाठी आज दिल्लीत कोअर कमिटीची बैठक पार पडली.

 

या बैठकीत अण्णांची नवी टीम तयार करण्यात आली. या टीममध्ये 15 मुख्य सदस्य असणार असून यामध्ये किरण बेदी, मेधा पाटकर, अविनाश धर्माधिकारी, संतोष हेगडे, राकेश रफीक, विश्वभर चौधरी यांचा समावेश असणार आहे. तसेच 100 आर्मीचे अधिकारी, 9 आयएएस अधिकारी त्यात 7 डीजीपी शिवाय हजारो प्रशिक्षकांचा सहभाग असणार आहे. यासाठी उद्या दिल्लीत नव्या ऑफिसचे उद्घाटनही केले जाणार आहे. तसेच येत्या 29 नोव्हेंबरपासून अण्णा आपल्या देशव्यापी दौर्‍याला सुरुवात करणार असून लोकपाल विधेयकासाठी जागृक करण्याचे अभियान यातून राबवले जाणार आहे. आमचं आंदोलन शिथिल झालं नाही ते वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. जनता ही देशाची मालक आहे. पण राजकारणी स्वत:ला मालक समजतात. रोज नवे नवे घोटाळे उघड होतं आहे त्याला जनता वैतागली आहे आता 2014 च्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जाग दाखवून देईल असं अण्णांनी म्हटलं आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन नव्या टीमची घोषणा केली.

 

अण्णांची नवी टीम
मेधा पाटकर, संतोष हेगडे, किरण बेदी, अविनाश धर्माधिकारी, अखिल गोगोई, निवृत्त डीजीपी शशिकांत, विश्वंभर चौधरी, अरविंद गौड
सुनिता गोदारा, कर्नल वीरेंद्र खोखर, राकेश रफिक, रणसिंह आर्य, शिवेंद्रसिंह चौधरी, अक्षय
 

Rate this article:
Average User rating on this article: 4 out of 5
प्रतिक्रिया

Posted by Shivshankar Bhadange

But to hume the people of INDIA will give his VOTE In2014 ,To which Party ? Anna have no any party 

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]