होम  »  ब्लॉग स्पेस

ब्लॉग स्पेस

सोमाली चाच्यांना वेसण घाला !
May 05, 2012
सोमाली चाच्यांना वेसण घाला !
Posted by ब्रिगे.हेमंत महाजन | {6} कॉमेन्ट्स

अफ़्रिकेच्या पुर्व किनार्यावर सोमालिया हा देश वसला आहे.गेली २० वर्ष य़ॆथे यादवी युद्ध सुरु आहे. लोक पुर्ण सुन्नी मुसलमान आहे. लाखो लोक यात मारले गेले आहेत. काही काम नसल्यामुळे तरुण चाचेगीरी कडॆ वळले आहेत. (समुद्रात जाणार्या जहाजाना लुटणे). या अफ़्रिकेच्या किनार्यावरुन अनेक भारतिय जहाजे प्रवास करतात. सोमालियन सागरी चाच्यांनी पकडून  ५५ ओलिस ठेवलेल्या भारतीयांच्या  बद्दल प्रश्न विचारत आहेत. सोमाली चाच्यांना वेसण कशी घालायची, हा प्रश्न भारताबरोबरच सर्व जगाला पडला आहे.

 

चाचेगिरीचे ४५० प्रकार ५१ जहाजे वा बोटींचे अपहरण


२०१० मध्ये आदेनचे आखात आणि भारतीय उपसागरात चाचेगिरीचे ४५० प्रकार घडले. त्यातून सुमारे २४ कोटी डॉलरची खंडणी उकळण्यात आली. सध्या या चाच्यांनी ५१ जहाजे वा बोटींचे अपहरण करून ८०० जणांना ओलीस ठेवले आहे. एका जहाजामागे साधारणपणे साडेपाच कोटी डॉलरची खंडणी चाच्यांकडून मागितली जाते. एखाद्या ओलिसाच्या सुटकेसाठी २००९ मध्ये सरासरी ५५ दिवस लागत असत आणि ३४ लाख डॉलर मोजावे लागत असत. हाच काळ २०१० मध्ये सरासरी १५० दिवस असा वाढला. सोमालियातील अराजक, पराकोटीचे दारिद्य्र, बेरोजगारी ही चाचेगिरी वाढण्याची कारणे होत. सोमालियात सध्या मध्यवर्ती सरकार नावाची चीजच अस्तित्वात नाही. पोटापाण्याचे साधन नसल्याने येथील टोळ्या लुटमारीकडे वळलेल्या दिसतात.  या चाच्यांच्या वस्त्यांवर थेट हल्ले करून त्यांना नष्ट केले पाहिजे.


त्यासाठी भारतीय नौदालानेच पुढाकार घ्यायला हवा आणि त्या समुद्री चाच्यांच्या घरात घुसून हल्ला करायला हवा .सोमालियात मध्यवर्ती सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नाही तर भीती कोणाची? आपण सोमालियाचा का एवढा विचार करतो हे कळत  नाही . धोका एवढा वाढला आहे कि काही दिवसांपासुन समुद्री व्यापार मुशकील झाला आहे. काही ठराविक बंदरे आहेत जिथून हे चाचे कार्यरत आहेत. पहिला उपाय म्हणजे त्या बंदरांवर आरमाराने तोफांचा भडीमार करणे. चाच्यांना बर्याचदा पकडण्यात येते पण या पकडलेल्या चाच्यांच काय करायचं याबाबत अंतर राष्ट्रीय पातळीवर मतभेद आहेत. त्यामुळे त्यांना काही दिवसांनी सोडून देण्यात येते. मानवी हक्क वगैरे बाजूला ठेवून तत्क्षणी गोळ्या घालण्यात याव्यात.

 

चाचेगिरीवर उपाय

 

अरबी समुद्रात सोमाली चाच्यांच्या उपदवाला आळा घालण्याचा प्रयत्न भारतीय नौदल करीत असले तरी चाच्यांचा उपद्रव थांब ण्याची फारशी  शक्यता दिसत नाही. उलट नौदलाने ताब्यात घेतलेल्या चाच्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात अनेक अडचणी येत आहेत. ही कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत या चाच्यांना पोसण्याची जबाबदारी मात्र सरकारवर येऊन पडली आहे. दोन वेळा खायची भ्रांत असलेले आणि समुदात जीव धोक्यात घालून वाटमारी करणारे हे चाचे मुंबईच्या जेलमध्ये सध्या मजेत दिवस कंठीत आहेत. चाच्यांची समस्या त्यांना पकडून अथवा शिक्षा करून सुटणारी नाही. सोमालिया हा यादवीत उद्ध्वस्त झालेला देश आहे. त्यामुळे तेथील जनतेचे हाल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात दारिद्य, बेकारी यामुळे सोमाली जनतेला हाताशी धरून आंतरराष्ट्रीय माफिया ही चाचेगिरी घडवून आणीत आहेत.


सोमाली चाच्यांनी जहाजे पळवून त्यातील कर्मचारी ओलिस ठेवल्यानंतर खंडणीची मागणी कुठल्या तरी भलत्याच देशातून येते आणि खंडणीची रक्कम तिसऱ्याच देशात पोहोचवावी लागते. थोडक्यात, सोमाली चाचे हे कुठल्या तरी अन्य देशातल्या माफियांचे बाहुले आहेत, हे उघड आहे. जोपर्यंत हे माफिया पकडले जात नाहीत, तोपर्यंत सागरी चाचेगिरीचा उपदव थांबण्याची शक्यता नाही. चाचेगिरीला आळा घालण्यासाठी सध्या फक्त भारत प्रयत्न करीत आहे, कारण त्याच्या समुदात हे प्रकार चालू आहेत. पण याबाबत आंतरराष्ट्रीय सहकार्य होणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रांनी यात लक्ष घालून आंतरराष्ट्रीय समुदात पकडल्या जाणाऱ्या चाच्यांवर कारवाई करण्याचे कायदे तयार करणे आवश्यक आहे. शिक्षा झालेल्या चाच्यांचे काय करायचे हेही ठरवणे आवश्यक आहे. मुळात सोमालियातील परिस्थिती सुधारावी व तोच चाचेगिरी थांबविण्याचा खरा उपाय आहे.


सरकारच्या घोषणा उत्तम  पण,


 सोमालियन चाच्यांचा उपद्रव व त्यांच्याकडून वेळोवेळी भारतीय व इतर नागरिकांना ओलिस ठेवून खंडणी उकळण्याच्या वाढत्या घटनांसंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची  बैठक झाली. यात राजनैतिक पातळीवरील, तसेच सक्रिय उपायांच्या संदर्भात विविध निर्णय करण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री यांनी संसदेत निवेदनाद्वारे दिली. एडनचे आखात आणि सोमालियाची किनारपट्टी या भागात होणाऱ्या चाचेगिरीला आळा घालण्यासाठीच्या विविध प्रस्तावांवर या बैठकीत चर्चा करण्यात येऊन विविध अशा प्रशासकीय, कायदेशीर आणि सक्रिय (ऑपरेशनल) स्वरूपाच्या उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली. जलपरिवहन, परराष्ट्र आणि संरक्षण या तीन मंत्रालयांतर्फे संयुक्तपणे मध्यम व दीर्घ मुदतीच्या कृतियोजना करण्याच्या प्रस्तावालाही बैठकीत मान्यता देण्यात आली.

एकंदर पाच जहाजांवरील 53 भारतीय खलाशी किंवा नाविक चाच्यांच्या ताब्यात आहेत. समितीने या ओलिसांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त करून त्यांच्या सुटकेच्या संदर्भात सर्व ते उपाय करण्याचा निर्णय केला. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली आंतरमंत्रालय गटाची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय ओलिसांच्या सुटकेसाठी प्रयत्न व उपायांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्याची जबाबदारी या गटाकडे देण्यात आली आहे. भारतीय नौदलासाठी उचित कृतीसाठी नियम व एडनच्या आखातातील मित्र देशांच्या नौदलांबरोबर चाचेगिरीच्या विरोधात सहकार्य वाढविणे, अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.सरकारच्या घोशणा उत्तम आहेत पण अमल बजावणि जास्त महत्वाची आहे.याच काळात चाच्यांनी १३भारतीयाचे अपहरण करून गेले २ वर्श त्याना ओलीस ठेवले आहे.

 

सोमालियामध्ये बंधक भारतीय खलश्यांना आपण परत केव्हा असणार?


13 भारतीय खलाशी गेल्या दोन वर्षापासून बंधक बनवलेले आहेत. या भारतीय कुटुंब राष्ट्रपतीपासून ते सुस्तावलेल्या नोकरशाहीपर्यत गेले दोन वर्ष चकरा आहेत. पण त्यांची सुटका झालेली नाही. सरकारी प्रवक्ते आणि मंत्री फक्त बसल्या बसल्या पोपटपंची करत असताना की आम्ही सोमाली चाच्यांशी वाटाघाटी करणार नाही.


माओवाद्यांशी वाटाघाटी तर सोमाली चाच्यांशी का नको?


भारताच्या आत आमदार आणि अधिकार्यांच्या सुटकेकरता एक नियम पण मीडियाचे लक्ष नसलेल्या नाविक आणि खलाश्यांकरता दुसरा नियम. त्यांच्या कुटुंबीयांना कोणाकडे मदत मागायची? सोमाली चाचे भारतीय खलाश्यांना भारताविरूध्द बदला घेण्याकरता बंधन बनवत आहेत. भारतीय नौदलाने एन्शच्या समुद्रात चाच्यांविरूध्द काही सशष्टृ कारवाया केले. त्यात थोडेफार यश मिळाले. पण त्यामुळे खवळलेल्या चाच्यांनी भारतीय खलाश्यांना आता मुद्दाम लक्ष बनवुन त्यांना बंधका बनवणे सुरू केले आहे. आता आपण काय करायला हवे. आपल्या समोर तीन पयार्य आहेत.

अ) त्यांच्याशी वाटाघाटी कराव्यात किंवा त्यांच्यावर हल्ला करुन आपल्या खल्याशांना सोडवावे. नुसती टीव्ही चॅनेल्सवर वायफळ चर्चा करुन हातावर हात ठेऊन बसणे चालणार नाही. काही पण झाले की, आपल्याला अमेरिकेकडे जाऊन तक्रार करायची सवय आहे. पण याने आतापर्यंत काय साध्य झाले ? आपल्याला स्वत:चा पायावर उभे रहायला पाहिजे आणि अमेरिका किंवा बाकी देश मदत करायला तयार नसतील तर आपले कमांडो वापरुन खलाश्यांची सुटका करायला पाहिजे.


आपण काय करतो आहे.


बाकी देश काय करतात. सध्या आपण अपहरणाचा मुद्दा वरून वेगवेगळ्या देशाची चर्चा करण्यात गुंतलो आहे.आपली नाौदलाची जहाजे सोमालियाच्या किना-यापाशी थोड्या प्रमाणात गस्त घालत आहे. पण या बचावात्मक (Defensive action)कारवाया आहेत. यामुऴे आपल्या खलाशांना पुर्ण संरक्षण मिळू शकत नाही. बाकी देशांची चर्चा आपल्या देशाच्या सागरी किनारपट्टीपासून 12 नॉटिकल माईलच्या बाहेर घटना घडल्यानंतर स्वत:चे रक्षण करण्याचा हक्क आहे. असला कायदा नक्कीच जरूरी आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर काही संस्था अपहरणामुळे अडकलेल्या खलाशांना मदत करत आहोत. त्यांच्याशी पण आपण संबंध प्रस्थापित करायला हवे.


सध्या अनेक सोमालिया चाचे आपल्या देशाच्या तुरुंगामध्ये आहेत. आपण त्यांचा वापर करुन, आपले गुप्तहेर सोमालियामध्ये पेरायला हवेत. आपल्या तुरुंगातील सोमाली चाच्यांच्या बदली आपल्या खलाशांना सोडवायचचा पण प्रयत्न करु शकतो. पण त्याकरता आपल्याला वाटाघाटीकरण्याकरता संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत चाच्यांविरुध्द सगळ्या कारवायांचे नियंत्रण करण्याकरता एक विभाग बनवायला पाहिजे. कायदे बनवणे, वाटाघाटींपासून लष्कर कारवाई संरक्षण मंत्रालयाच्या हाताखाली करायला हवी.


आपली घाबरट नोकरशाही काहीच करू नये असा सल्ला देते. कारण आपण जर आपल्या लष्करी कारवाईत जर आपले गेले तर काय होईल? जर काही बंधन मारले गेले तर काय करायचे? जर लष्करी कारवाई करायची असेल तर सुरक्षा दलंाना कायद्याचे संरक्षण जरूरी आहे. आपण आपल्या देशात सुरक्षा दलंाना संरक्षण देण्याकरता बानलेल्या आर्मड् फोरसेस स्पेशल पॉवर ऍक्टप्रमाणे समुद्रामधल्या कारवाईकरता किंवा सोमलियात लष्करी कारवाईकरता किंवा सोमालियात लष्करी कारवाई करण्याकरता वरहुकूम करून करणे जरुरी आहे.


लष्करी कारवाईचा पर्याय


आज आपल्यादेशाकडे मार्कोस (भारतीय नौदलाचे कमांडो) ,नॅशनल सेक्युरिटी गार्ड (भारतिय सैन्याचे जवान व अधिकारी) असा कामात पारगंत आहे. आपल्याला आठवत असेल की अत्तापर्यंत जितके आतंकवादी हल्ला करायला आत आले ,त्या सगळ्यंाना आपल्या कमांडोंनी ठार केले. आपल्या कमांडोजचा आपण देशाच्या बाहेर वापरण्याची तयारी ठेवावी. अर्थात त्याकरता अजुन चागंली शस्त्रे नियोजन आणि ट्रेनिंगची गरज आहे. आपली गुप्तहेर माहिती (Actionable intellegence) अचुक असायला पहिजे.आज अमेरिका इस्त्राईल आणि अजून काही देश अशा प्रकारची गुप्त कारवाई आपल्या शत्रुविरुध्द बाहेरच्या देशात जाऊन करतात. यांना कोव्हर्ट ऑपरेशन (Convert Operation) म्हटले जाते. यात भाग घेणार्‌या सैनिकांना देशाच्या कायद्यांचे संरक्षण प्रदान केले जाते.


सोमालिया देशावर सध्या कोणाचेच नियंत्रण नाही त्यामुळे त्या देशात जाऊन केलेल्या कमांडो कारवाईला सगळ्या जगाचे सर्मथन मिळु शकले .2012 मध्ये अमेरिकेच्या सिल कमांडोजनी आणि दक्षिण कोरियाने हल्ले करून आपल्या खलाशांना सोडवले आहे.आपणपण आपल्या नागरिकांचे रक्षण करायला शिकायला पाहिजे. आपले सैनिक समर्थ आहेत पण आपल्या राज्यकर्त्यांकडे अशी राजकिय इच्छाशक्ती आहे का ? 

 

-लेखक ब्रिगेडिअर हेमंत महाजन

 

लेखक हे राष्ट्रीय सुरक्षा विषयावरील तज्ज्ञ आणि युध्दशास्त्राचे अभ्यासक आहेत

 

 

प्रतिक्रिया

Posted by naresh namdeo ghongepatil

आपल्या राज्यकर्त्यांकडे अशी राजकिय इच्छाशक्ती आहे का ?

Posted by milind

excellent work sir, as a marchantial   mariner, i thank you to bring up this topic. however in somalaya they are considered as gods, as they bring food and essentials to locals... secondly we hv to deal with international issues such as human rights and religion. it may start another migration like what is happening to assami.. our govt and babus dont have guts to do this. we as citizens are ready to face the consequences but we our babus and leaders have looser mentality god save us...

Posted by milind

असा हल्ला करणे हे मनमोहन सिंग यांच्या प्रकृती बाहेरचे  आहे. उगाच अश्या सूचना करुन त्यांचे  राहिलेले दिवस अवघड करू नका . सुखाने जगू द्या .... सोनिया... सोनिया....

1
. 2 .

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]