होम  »  कार्यक्रम

तयारी दहावीची - मराठी
  कार्यक्रम वेळ : Mar 03, 2009
05:30 AM
तयारी दहावीची - मराठी
तयारी दहावीची - मराठी
तयारी दहावीची - मराठी

तयारी दहावीची या कार्यक्रमात आजचा विषय होता इंग्रजी माध्यमासाठी मराठी. या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर होत्या मुंबईतल्या दादरच्या मॉर्डन इंग्लिश स्कूलच्या रजनी म्हैसाळकर मॅडम . रजनी मॅडमनी दहावीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन केलं.
आपल्या कार्यक्रमात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले ते पुढीलप्रमाणे

उत्तर मुद्देसूद आणि सुवाच्य अक्षरात लिहा
प्रश्न नीट वाचा, प्रश्न समजून द्या
नेमकं उत्तर लिहा
व्याकरणाकडे लक्ष द्या
निबंधाचा सराव करा, सारांश लेखनाचा सराव केला
पेपर सोडवण्याचा स्वत:चा पॅटर्न ठरवा
उत्तरांमध्ये फाफटपसारा टाळा
दिलेल्या शब्दसंख्येत उत्तरं लिहायचा प्रयत्न करा
 


विषय - मराठी
एकूण गद्य पाठ 12
एकूण कविता 12
स्थूल वाचन 4 धडे

पेपर पॅटर्न
एकूण गुण 80
दीर्घोत्तरी प्रश्न गद्य 12 गुण
दीर्घोत्तरी प्रश्न पद्य 12 गुण

वस्तुनिष्ठ प्रश्न गद्य 10 गुण
वस्तुनिष्ठ प्रश्न पद्य 3 गुण
संदर्भासहित स्पष्टीकरण पद्य 3 गुण
स्थूल वाचन 8 गुण
निबंध लेखन 10 गुण
व्याकरण 10 गुण
कथालेखन 4 गुण
आकलन 4 गुण
वृत्तांत लेखन 4 गुण
जाहिरात 4 गुण


 
प्रतिक्रिया कळवा
विषय / कार्यक्रम
प्रतिक्रिया
नाव
ईमेल
शहर
दूरध्वनी